पाहिले मी सचिन देवा. . याची देही याची डोळा. .
"७० मिनट है तुम्हारे पास. शायद ये तुम्हारे जिंदगीके सबसे खास सत्तर मिनट. तो जाओ और ये सत्तर मिनट जी भर कर खेलना. ये सत्तर मिनट तुमसे कोई नाही छिन सकता.
"
सचिन जेव्हा दुस-या दिवशी मैदानात उतरला तेव्हा नियती असच काही म्हणाली असेल. आणि खरंच. तो आला, तो जवळपास साठ सत्तर मिनिटे खेळला, आणि त्याच्या चाह्त्यांना एक शेवटची भेट देऊन गेला. काश नियतीने त्याला अजून थोडा वेळ दिला असता. असो.

सचिन रिटायर होणार कळल्यापासून सारख वाटत होतं कि त्याला एकदा तरी खेळताना पाहावं. हो अगदी शेवटच. कारण देव पुन्हा पुन्हा असे अवतरत नसतात. पण त्याला पाहायला मिळणं तेवढं सहज शक्य नव्हतं. त्याच्या चाहत्यांसाठी जेमतेम पाच हजारच्या आसपास तिकिटे आहेत हे कळल्यावर डोळ्यासमोर अंधारी आली. वाटले हि संधी पण गेली. तरी बुकिंग चालू होताच प्रयत्न केला. पण वेब साईट चालूच होईना. अन झाली तेव्हा सर्व तिकिटे फ़ुल्ल.२०० व्या
match चा दिवस उजाडला. सर्व इच्छा आकांक्षांना हृदयात बंदिस्त करून ऑफिसला गेलो. ऑफिसमधून परत येताना पहिल्या दिवसाचा खेळ संपला होता. रेडीओ 9२.७ बिग एफ एम वर जुनी गाणी ऐकत परतताना एक आवाज ऐकला. "सचिन को खेळते देखनेका आखरी मौका. अगर आप मेरे साथ कल स्टेडीयम आना चाहते हो तो अपने मेसेज मोड मे जाओ डायल करो बिग (स्पेस) सचिन (स्पेस) आपका नाम और भेजदो …. नंबर पर " अरे यार. नम्बरच नाही ऐकला. आता काय करायचं. वेळ किती आहे माहित नव्हतं. पुन्हा तोच आवाज यायची वाट बघायची तर तो पर्यंत वेळ संपला तर? नाही आता थांबणं शक्य नव्हतं. ताबडतोब मी अल्लाउद्दीनचा दिवा काढला. अहो म्हणजे गुगल हो. सर्च केल. अल्लाउद्दीनने दुस-या कोणत्यातरी संदर्भाशी निगडीत असलेला बिग एफ एम चा नंबर दिला. म्हंटलं ट्राय करूया. पाठवला एस एम एस. thanks चा reply आला. हायसं वाटलं. नंबर बरोबर होता. मी स्वप्न पाहू लागलो सचिनच्याभेटीची . थोडा वेळ गेला पण मनशांती मिळेना. मग गाडीत बसल्या बसल्या मेसेज पाठवत राहिलो. त्यांच्या फोनची वाट पाहत थोड्या वेळाने घरी पोचलो. फोन काही आला नाही. फ्रेश झालो. मनाची समजूत काढली आणि फोन वाजला. धावत जाऊन फोन उचलला. अनोळखी नंबर होता. पण उचलल्यावर कळल कि तो एका जुन्या मित्राचा होता त्याच्याशी बोललो. आणि मुलाबरोबर गार्डन मध्ये जायला निघालो. परत फोन वाजला. परत अनोळखी नंबर. देवाचं नाव घेत फोन उचलला. "hello. . अमेय? अमेय मै बिग एफ एम से बात कर रहा हू Congratulations!!!"
मी अक्षरशः उडालोच. सर्व मुंबईकरांमधून कॉम्प्युटरने माझे नाव निवडले होते. मी स्वताशीच हसत होतो. मुलगा म्हणाला
"बाबा, काय झालं ? असे का हसताय?" त्याला काय सांगणार? ज्या नाट्यमय घटना घडल्या होत्या त्या समजायचं त्याच वय नव्हतं. बायकोला फोन लावला. सर्व सांगीतल. बायको म्हणाली "मस्करी करू नका आधीच ऑफिसमध्ये खूप टेन्शन आहे मला". आता काय करू ? बायको घरी आल्यावर तिला परत सगळं सांगितलं.
ती म्हणाली " बर्. किती वाजता जायचय?
मी "माहित नाही. ते फोन करणार आहेत परत "
ती "कसं जायचय?"
मी "ते गाडी पाठवणार आहेत"
ती" अहो.. एवढे लोक प्रयत्न करताहेत. कोणालाच तिकिटं मिळाली नाहीत आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला फ्री तिकीट मिळालंय. कसं शक्य आहे ?"
या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हत. मी वाट पाहत होतो. रात्रीचे अकरा वाजले. त्यांचा परत फोन आला नव्हता. मीही आता थोडा टेन्स होऊ लगलो. ज्या नंबरवरून फोन आला होता त्यावर फोन लावला. फोन कोणी उचलेना. मग बायको समजूत घालू लागली. म्हणाली कोणीतरी मस्करी केली असेल. जाऊ दे.
साडेअकरा वाजले. आणि परत फोन वाजला. सकाळी कांजुरमार्गला भेटायचे ठरले. शेवटी बायकोचा विश्वास बसला. मी अंथरुणावर पडलो. झोप लागेना. सव्वा बारा वाजले. मनात विचार आला सचिनला भेटायची संधी मिळाली तर? लगेच उठलो. तयारी केली. कॅमेरा, मोबाईल पोर्टेबल चार्जर, मार्कर पेन जे जे सुचलं ते घेतलं. सचिनला गिफ़्ट म्हणून खडूवर कार्विंग करायला बसलो. "SACHIN WE LOVE U" कोरलेलं कार्विंग बनवून दिड वाजता पुन्हा झोपायला गेलो. सकाळी चार वाजता उठून सर्व आवरून ताईकडे गेलो कॅमेरासाठी झूम लेन्स आणायला. सर्व आटपून साडे सहा वाजता कांजूरला पोचलो. रात्री ज्यांचा फोन आला होता त्याच्याशी म्हणजे स्वप्नीलशी फोनवर बोललो. ते सात पर्यंत येणार होते. तोपर्यंत मी जवळच एका हॉटेलात नाश्ता केला. बरोबर सात वाजता गाडी आली. स्वप्नील आणि दिलीप गाडीत होते. दिलीप म्हणजे ज्यांना आपण ९२.७ रेडीओवर संध्याकाळी ऐकतो ते. एकदम मस्त माणूस. एनर्जेटीक. . सतत हसरा चेहरा आणि गोड आवाज. गप्पा मारत वानखेडेला पोचलो. गेल्यावर कळलं कि आत काहीच न्यायला परवानगी नाही. माझी रात्रभर केलेली मेहनत वाया गेली. माझं सर्व सामान गाडीतच ठेवावं लागलं.
वानखेडेच्या बाहेर मीडियाची गर्दी होती. हळूहळू लोक देवदर्शनासाठी येऊ लागले होते. मधेच एखादा मोठा ग्रुप "सचिन सचिन" चा घोष करत वातावरण रोमांचित करत होता. आम्ही रेडीओवर पहिले अपडेट दिले. मीही बोललो. मजा आली. सर्व सिक्युरिटी पार पाडत आत गेलो. मनात आलं या सिक्युरिटी गार्डना कसं वाटत असेल आत एवढी महत्वाची कसोटी चालू असताना इथे उभं राहायला?
आत गेलो. अगदी मंदिरात आल्यासारखं प्रसन्न वाटलं. मैदानात सर्वात वरती मैदानाच्या छपरावर सचिनने झळकावलेल्या प्रत्येक शतकाची माहिती देणारे फलक गोलाकार लावले होते. मैदानाच्या सभोवती सचिनचे मोठमोठाले पोस्टर झळकत होते. हळू हळू मैदान भरू लागले. वातावरण सचिनमय झाले होते. आणि थोड्यावेळातच तो आला. थोड्या practice साठी. लोकांनी एकच जल्लोष केला. आम्ही आमच्या जागा कुठे आहेत ते बघितल्या. अर्थात बसणार कोण होत?

खेळ सुरु व्हायची वेळ आली. सर्व practice आटपून आत गेले. आणि umpire मैदानात उतरले. आम्ही रेडीओवर मध्ये मध्ये अपडेट देत होतो. वेस्ट इंडीजचे खेळाडू आले. आणि थोड्याच वेळात तो आला. सर्व लोक उभे राहून त्याचे स्वागत करत होते. सर्वत्र फक्त "सचिन सचिन" एवढंच ऐकू येत होतं. सर्वजण बेभान झाले होते. खेळ सुरु झाला. सचिनने पहिली धाव घेतली. मग पुढच्या ओवरमध्ये एक चौकार. . पुन्हा एक चौकार. क्या बात है. चेंडू अक्षरशः बंदुकीच्या गोळीसारखा सीमेपार जात होता. नंतर पुन्हा एकोणचाळीसाव्या षटकात अजून एक चौकार !! आणि सचिनची हाफ सेन्चुरी पूर्ण. लोक बेभान होऊन नाचत होते. सचिन च्या नावाव्यतिरिक्त दुसरे काहीच ऐकू येत नव्हतं. पहिला मैलाचा दगड पार पडला होता. आता सर्व पुढच्याची आतुरतेने वाट पाहू लागले. मधून मधून टिनो बेस्ट सचिनची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करत होता. मधेच सणसणीत बाउन्सर टाकत होता. लोकांना ते अजिबात सहन होईना. सर्वानुमते टिनो व्हिलन झाला होता. लोक त्याची हाय हाय करत होते. मध्येच एकदा इशांत शर्मा बारावा खेळाडू म्हणून मैदानात आला. त्याचा अलीकडचा परफ़ोर्मन्स आठवून लोकांनी मस्करीत इशांतला बोलिंग द्यावी असाही कल्ला केला. सगळं केवळ सचिनच्या प्रेमापोटी. आज सचिनला डोळे भरून पाहायचं होते. दिवसच तसा होता. त्याच्यापुढे लोकांना दुसरे काहीच सुचत नव्हते. इतके बेभान झालेले कि भारताने वेस्ट इंडीज च्या धावांचा टप्पा ओलांडला तेही लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला. दुसरीकडून पुजाराची हाफ सेन्चुरी झाली. थोड्यावेळाने ड्रिंक्स ब्रेक झाला. आम्ही एक रेडीओ अपडेट दिले. ड्रिंक्स नंतरची पहिली ओव्हर. देवनारायण बोलर. पाचव्या चेडूवर एका छान झेलने सचिन आउट! क्षणभर प्रचंड शांतता. पण दुसऱ्याच क्षणी लोकांनी परत सचिनच्या नावाचा जयघोष करायला सुरुवात केली. त्यांचा आवडता आपलासा वाटणारा सचिन परत जात होता. सर्वांचे डोळे भरून आले होते. दुसरा मैलाचा दगड दूरच राहिला होता. पण जाण्याआधी त्याने सर्वांना खूष केले होते इतके वर्ष आपल्याला भरभरून देणारा सचिन जाता जाता ७४ धावा करून परतत होता. नियतीने एका देवाची शेवटची विकेट घेण्यासाठी ‘देवनारायण’ची निवड केली होती. काय योगायोग होता तो.
सचिन गेला आणि मैदान शांत झाले. थोडावेळ कोणाचेच लक्ष लागेना. काही लोक मैदान सोडून निघून गेले. जेमतेम चाळीस धावांचा लीड होता. थोड्यावेळाने लोकांनी स्वतःला सावरले. लोकांना चिअर अप करायला मोठ्या स्क्रीनवर पुन्हा पुन्हा सचिनच्या क्लिप्स दाखवत होते. क्लिप लागल्या लागल्या लोक पुन्हा सचिन सचिन ओरडू लागत. आता लोकांनी डाव घोषित करायच्या घोषणा द्यायला सुरुवात केल्या. त्यांच्यासाठी मैच जिंकणं महत्वाचं नव्हतच. त्यांना फक्त सचिनला पुन्हा मैदानात दुसऱ्या डावासाठी यावं एवढीच इच्छा होती. थोड्यावेळात आम्ही बाहेर आलो. लंचब्रेक जवळ आला होता. आम्ही थोडं खाउन थोडावेळ बाहेर फिरलो. माननीय उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांना परत जाताना बघितलं. सचिनचे पुस्तक,
stamps विकत घेतले. सचिनच्या पोस्टर्स बरोबर फोटो काढले. बाहेर एक मोठ्ठी bat होति. त्यावर सचिनसाठी मेसेज लिहिला. थोड्यावेळाने दिलीप यांनी मैदानात न परतताच जायचे ठरवले. पण माझे पाय तिथेच घुटमळत होते. मग त्यांना पुन्हा
thanks म्हणून मी परत मैदानात फिरलो. खूप दमल्यासारखे वाटत होते. रात्रीचे जागरण आता जाणवू लागले होते. तिथे जाऊन थोडावेळ शांत बसलो. बरं वाटले. जवळ जवळ २५% लोक निघून गेले होते. हळू हळू धावांची बढत वाढत होती. पुजाराने शतक केले आता एक अनपेक्षित घटना घडत होती. सर्वचजण वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना सुद्धा सपोर्ट करत होते. मध्येच टिनो टिनो चा सूर लागायचा. कारण फक्त एकच. लवकरात लवकर
batting संपली तर सचिनला परत चौथ्या डावात पाहता येईल हि वेडी इच्छा. धोनी आउट झाल्यावर त्याचा पण लोकांनी आनंदाने स्वीकार केला. बढत वाढत गेली. दीडशे, दोनशे, अडीचशे. रोहितचे शतक पूर्ण झाले. आता लोक बिथरले. डिक्लेअर धोनी डिक्लेअर धोनी असा नारा सतत दुमदुमत होता. पण त्या प्रेक्षकांचा आवाज, त्यांची भावना कोणाच्याच हृदयापर्यंत पोचू शकली नाही. आणि शेवटच्या विकेटसाठी ऐंशी धावांची विक्रमी भागीदारी करून अन तीनशे तेरा धावांची बढती घेऊन अखेरीस भारतीय डाव संपला. लोक पुन्हा त्याची वाट पाहू लागले. आणि तो क्षेत्ररक्षणासाठी का होईना पण परत मैदानात आला. लोक पुन्हा खुश झाले. मलाही मी घरी परत न गेल्याचा आनंदच झाला. पुन्हा देवदर्शन झाले. अन आता थोडं जवळून झाले. सचिनच्या बरोब्बर मागे असलेल्या
stand मध्ये मी होतो. लोक प्रत्येक बॉल आमच्या दिशेला यावा यासाठी प्रार्थना करत होते. जवळच्या बॉल बॉयला उद्देशून म्हणत होते 'अरे बॉल इथे आला तर लगेच परत नको करूस'. बॉल एकदोनदा आमच्या दिशेने आला पण सचिनला एकदम जवळून नाही बघता आले. थोड्याच वेळात आजच्या दिवसाचा खेळ संपला. त्यांच्या तीन विकेट गेल्या होत्या. विजय निश्चित होता. अन सचिन पुन्हा batting करायला उतरणार नाही हे हि जवळपास नक्कीच होतं. मैदानातून बाहेर पडलो. सी एस टी च्या दिशेने जड अंतःकरणाने पावले पडायला सुरुवात झाली. माझ्या हातातील सचिनच्या पुस्तकामुळे समोरून येणारी प्रत्येक नजर माझ्यावर थबकत होती. स्टेडीयम मागे राहिले होते. मनात एकाच विचार होता. पुन्हा कधी माझ्या आयुष्यात एखाद्या खेळाडूसाठी, त्याला डोळे भरून पाहण्यासाठी स्टेडीयमकडे पावले परततील का? होकारार्थी उत्तर सापडत नव्हतं.
No comments:
Post a Comment